युवक काँग्रेसच्या वतीने अंकिता भंडारी यांना श्रद्धांजली
उदगीर : उत्तराखंड येथील एका भाजपा मंत्र्याच्या मुलाने अंकिता भंडारी या युवतीस पाण्यात ढकलून देऊन तिची हत्या केली. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून अंकिता भंडारी या युवतीस शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर
श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय निटूरे,शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मंजूरखां पठाण,माजी उपनगराध्यक्ष फैजूखा पठाण, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगीरे,भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संजय काळे, उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल घुमाडे,लातूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्रीनिवास एकुर्केकर,उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस फैयाज डांगे,मनोज कलबुर्गे,उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस ॲड.यशवंत पाटील,अशिषसिंग ठाकुर,प्रकाश गायकवाड़,रामजी पिंपरे, विपिन जाधव,सचिन बिरगे आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments