GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर - लातूर रोडवर भीषण अपघात ; पाच मयत तर एक जखमी

उदगीर - लातूर रोडवर भीषण अपघात ; पाच मयत तर एक जखमी

उदगीर : उदगीर तालुक्यातील लोहारा येथे उदगीर - लातूर रस्त्यावर महामंडळाची बस व एका खाजगी कारचा भिषण अपघात होवून त्यात ५ जण जागीच ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना दि.४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर - लातूर या महामार्गावर महामंडळाची बस क्र.एम.एच. १४ बी.टी. १३७५ उदगीर ते चाकुर या बसला स्विफ्ट डिझायर ही खाजगी कार क्र.एम.एच.२४ ए.बी. ०४०८ या कारने समोरून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भिषण होता की समोरासमोर धडक झाल्यानंतर खाजगी कार रस्त्याच्या खाली गेली तर बसचे समोरील एका बाजुचे चाके निघून गेली. 

सदर खाजगी कार मधील सर्वजण हे उदगीर येथील एका खाजगी रूग्णालयात नर्सचे काम करत होते. यात खाजगी कार मधील 1) अलोक तानाजी खेडकर, रा. संत कबीर नगर,उदगीर (मयत) 2)अमोल जीवनराव देवकते,  रा. रावनकोळा (मयत), 3)कोमल व्यंकट कोदरे रा. डोरनाळ ता.मुखेड (मयत), 4)यशोमती जयवंत देशमुख, रा. यवतमाळ (मयत), 5)नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार , रा. बिदर रोड, उदगीर (मयत) हे ५ जण जागीच मयत झाले तर 6) प्रियांका गजानन  बनसोडे, रा. येरोळ ह .मु. गोपाळ नगर, उदगीर हे जखमी असुन तिला पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.
उदगीर येथील ६ जण तुळजापूर येथून देवीचे दर्शन घेवुन भाविक कारने परत येत असताना हा अपघात घडला.
या अपघातात बस मधील १५ प्रवासी जखमी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
हा अपघात एवढा भिषण होता की अक्षरशः २-३ नागरीकांचा चेंदामेंदा झाला होता.

Post a Comment

0 Comments