GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

आमदार संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून उदगीर मधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक अॅप

आमदार संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून उदगीर मधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक अॅप

साडे चार कोटी रुपयांचे मोफत शैक्षणिक अॅपचे वाटप 


उदगीर : तळागाळातील विद्यार्थी शिकला पाहीजे, नवीन तंत्रज्ञान मुलांना माहिती व्हावे मुलांना गणित व विज्ञान या सारख्या अवघड विषयाचं दडपण राहू नये म्हणून राज्याचे माजी मंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून उदगीरमधील शालेय मुलांना शैक्षणिक अॅप वाटपाचा उपक्रम चालू आहे. 

या अॅपसाठी येणारा तब्बल साडे चार कोटी रुपयांचा मोफत शैक्षणिक अॅप वाटप करण्यात येत असुन यासाठी लागणारा संपर्ण खर्च आमदार संजय बनसोडे यांनी स्वखर्चातून करत आहेत. त्यामुळे या 
मोफत शैक्षणिक अँपचे वाटप करण्यात येत आहे.
आमदार संजय बनसोडे यांच्या या शैक्षणिक दुर दृष्टीमुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा होणार असल्याने पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. २१ व्या शतकात एकीकडे आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही अनेक ठिकाणी विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. अडचणीमुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये.

आजच्या युगात शिक्षणासारख्या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करु नये म्हणून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमदार संजय बनसोडे यांनी हा शैक्षणिक अॅप वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
या अॅपमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागणार असुन अवघड असलेले विषय सोपे होवून उदगीर मधील प्रत्येक विद्यार्थी हा आय.ए.एस अशा मोठ्या पदावर जातील अशी अशा आ.बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. हे शैक्षणिक अॅप प्रा. योगेश सूर्यवंशी 
व लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या अथक परिश्रमातुन विद्यार्थ्यांच्या सेवेत आला आहे.

Post a Comment

0 Comments