पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन
उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर व हटकर समाज बांधव असून त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला दाद देत निवडणुकीपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा उदगीर मध्ये बसवण्याचे आश्वासन आ.संजय बनसोडे यांनी दिले होते. त्याच वचनाची वचनपूर्ती म्हणून उदगीर येथील अहिल्यादेवी होळकर गार्डन मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन
मागील दोन वर्षांमध्ये याबाबतचे सर्व प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये चा निधी मंजूर केला व आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन अहिल्याबाई होळकर गार्डनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगटोल, रासपचे नागनाथ बोडके, बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सुदर्शन मुंडे, कैलास पाटील, इब्राहिम पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.बनसोडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली वचनपूर्ती करण्याचा मनस्वी आनंद होत आहे येणाऱ्या काळामध्ये वचनपूर्ती पूर्ण करण्यासह विकासाचा शिल्लक बॅकलॉग भरून काढण्याच्या आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आदर्श लहान मोठ्या व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्याची जाणीव ठेवून समाजामध्ये वावरला पाहिजे हीच भावना मनामध्ये बाळगून या पुतळ्याच्या चबुतरया कामाचा शुभारंभ केला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रेरणा मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली आहे, म्हणून या पुतळ्याच्या शुभारंभ करताना मनस्वी आनंद होत असल्याचे सांगितले.
0 Comments