GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

नरेंद्र मोदी यांच्या सेवाभाव वृत्तीमुळे संबंध देशांमध्ये सामाजिक कार्य व्यापक झाले : राहुल केंद्रे

नरेंद्र मोदी यांच्या सेवाभाव वृत्तीमुळे संबंध देशांमध्ये सामाजिक कार्य व्यापक झाले : राहुल केंद्रे 

उदगीर : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवाडा मोहीम राबवत असून याचे औचित्य साधुन हंगरगा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम पार पडली.
 यावेळी गावातील सामाजिक राजकीय लोकांनी एकत्र येऊन गावातील मंदिर, मज्जिद, बौद्ध विहार, अण्णाभाऊ साठे, सामाजिक परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
 यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करताना राहुल केंद्रे म्हणाले की नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून आज सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला स्वच्छतेची जाणिव निर्माण झाली असून याचाच भाग म्हणून भारतीय जनता पार्टीने 17 तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा अशा माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याचा भाग म्हणून या ठिकाणी आपण आज हंगरगा येथे स्वच्छता मोहीम राबवत असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्ष अविरतपणे 18 - 18,  20 -20 तास नरेंद्र मोदी देशाची सेवा करत असून आज सबंध जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पहिली पसंती मोदी यांना मिळाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या विकासाची दूरदृष्टी 'सबका साथ, सबका विकास' या अनुषंगाने मोदी 
सरकार काम करत असून शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून मोदींनी योजना आखल्या असून त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार व भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे.
   यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय पाटील, भाऊसाहेब जांभळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष इरशाद शेख, गावच्या सरपंच राठोड, उपसरपंच दयानंद सूर्यवंशी, नानासाहेब माने, सत्तार भाई, पठाण अकबर, पठाण गुणवंतराव, माने प्रदीप, सूर्यवंशी संजीव पाटील यांच्यासह गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments