GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर तालुक्यातील मौ. मादलापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 11 कोटी 43 लाखांचा निधी मंजूर - पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे

उदगीर तालुक्यातील मौ. मादलापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 11 कोटी 43 लाखांचा निधी मंजूर - पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे

मादलापूर येथील पाणीपुरवठा योजनेतून पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली

उदगीर : तालुक्यातील मौजे मादलापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाने मंजूरी दिली असुन उदगीर येथील मौ. मादलापुर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 11 कोटी 43 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
मागील अनेक वर्षापासुन या गावातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे.  शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुध्द 55 लिटर पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. या योजनेतून प्रत्येक घरात नळ जोडणी देणे आवश्यक असते, यासाठी शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
 मादलापुर या गावासाठी देवर्जन मध्यम प्रकल्प ता. उदगीर येथून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमधून जल शुध्दीकरण केंद्र, जलकुंभ वितरण व्यवस्था, शुध्द पंपीग मशिनरी उभारण्यात येणार आहे. मादलापूर येथील या पाणी पुरवठा योजनेची त्वरीत अंमलबजावणी करून ही  योजना लवकर कार्यान्वीत करण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जनस्तंभ न्यूज नेटवर्कला आहे.

Post a Comment

0 Comments