धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रक्तदान शिबिर
म.फुलेनगर येथील युवकांचा पुढाकार
उदगीर : येथील महात्मा फुलेनगर येथे पू. महास्थवीर चंद्रमणी बुद्ध विहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, सय्यद जानी,दिलीप सोनकांबळे, दिनेश बिदरकर, शिवकुमार कांबळे, शशिकांत बनसोडे, पंढरीनाथ वायगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी माधव वाघमारे, प्रकाश कांबळे, काशिनाथ सूर्यवंशी, अविनाश गायकवाड, अनिल कुसाळे, अरविंद कांबळे, बबलू मसुरे, रामचंद्र कांबळे, गोविंद वाघमारे, प्रकाश मसुरे, किशन कांबळे, अॅड. जयवर्धन भाले, विकी काळे, तुकाराम गुंजाळे, राजू पवार, बालाजी भालेराव, शुभम कांबळे, रतन सावंत, नरेश ठाकूर, करण गायकवाड, कृष्णा वाघमारे पुढाकार घेतला.
0 Comments