GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

हेरिटेज तर्फे पशुरोग निदान शिबीराचे आयोजन

हेरिटेज तर्फे पशुरोग निदान शिबीराचे आयोजन

उदगीर - हेरिटेज फुड्स लि. दुध डेअरी उदगीर अंतर्गत येणाऱ्या मौजे सताळा येथे पशुरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. 
          या शिबिरात चालत्या-फिरत्या पशुरोग निदान व्हॅन चा माधयमातुन गावातील शेकडो जनावरांवर मोफत उपचार करण्यात आले, या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शिवलिंग जळकोटे यांचा हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हनुन हेरिटेज दूध डेयरी चे एरिया मेनेजर वीरभद्र बिरादार, डॉक्टर दारनुले, साहाय्यक रंजित बिबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बी.पाटील, प्रगतिशील शेतकरी गोपे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
        उपस्थित मान्यवरांचा सत्कार सताळा गावचे चेअरमन यशवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, व गावातील पशुपालकांना हेरिटेज फुड्स तर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजना ,त्यात पशुपालकांचा अपघाती विमा कवच, जनावरांची प्रत्येक महिण्यात विविध तपासणी, गर्भ धारण, गोचीड औषध फवारणी, कमी दरात खाद्य पदार्थ व वेट प्लस अॅप द्वारे आपल्या समस्या कंपनी ला हेल्पलाइन द्वारे कळवणे, अशा अनेक सुविधा पुरवल्या जातात, याची सविस्तर माहिती एरिया मैनेजर वीरभद्र बिरादार व डॉक्टर दारनुले यानी दिली, व गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी जनावरे आनली होती, या वेळी गावातील नागरिक व पशुपालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments