GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

दर्जेदार बालसाहित्याला उभारी देणार : जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे रसूल पठाण यांच्या "निसर्गाशी जुळवू नाते.." या बाल कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

दर्जेदार बालसाहित्याला उभारी देणार : जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे

रसूल पठाण यांच्या "निसर्गाशी जुळवून नाते.." या बाल कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

उदगीर : साहित्याच्या प्रांतात बालसाहित्य आजही उपेक्षित आहे. बालकांच्या भावविश्वाची जाणीव ठेवून लिखाण करणाऱ्या दर्जेदार बालसाहित्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात अ. भा. मराठी बालकुमार साहित्य परिषद व शिवार साहित्य प्रबोधन मंच तर्फे रसूल पठाण यांच्या "निसर्गाशी जुळवून नाते.." या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन राहुल केंद्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद चौधरी होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,  नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, डॉ. रामप्रसाद लखोटीया, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, विलास सिंदगीकर प्रा. महादेव स्वामी, कवी रसूल पठाण आदींची उपस्थिती होती. प्रारंभी वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. रामदास केदार यांनी केले  यानंतर कवी श्री व सौ. रसूल पठाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बसवराज पाटील नागराळकर यांनी साहित्याच्या माध्यमातून मूल्यांची पेरणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर रामचंद्र तिरुके यांनी उदगीरच्या सांस्कृतिक वैभवात या पुस्तकाने भर पडल्याचे सांगितले. रमेश अंबरखाने यांनी पर्यावरणाच्या प्रश्नाला साहित्यातून प्रतिबिंबित केल्याचे कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विलास सिंदगीकर यांनी रसूल पठाण यांची कविता संस्कार मूल्ये जपत विद्यार्थ्यांना गुण-गुणायला लावणारी आहे, असे सांगितले. धनंजय गुडसूरकर यांनी अक्षर पंढरीच्या या वारकऱ्यांनी बालकासाठी वेगळी अक्षर निर्मिती केेेेेेेली आहे, ही  गौरवास्पद बाब असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय  समारोपात प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी बालसाहित्याचा क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्याची गरज असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनिता येलमटे यांनी केले तर आभार श्रीपाद सीमंतकर यांनी मानले. यासाठी लक्ष्मण बेंबडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, बिभीषण मद्देवाड, अंकुश सिंदगीकर, रवींद्र हसरगुंडे, अमर जाधव आदींनी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments