GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा वाढदिवस साजरा मनोज आण्णा कपाळे मित्रमंडळाचा पुढाकार

माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा वाढदिवस साजरा                                                     
मनोज आण्णा कपाळे मित्रमंडळाचा पुढाकार 


उदगीर : येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उदगीर शहरात तब्बल सात वेळा नगराध्यक्ष पद भुषविलेले माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा वाढदिवस मनोज कपाळे मित्र मंडळाच्या वतीने काल दि.10 ऑगस्ट रोजी सायंकाळी कपाळे फार्महाऊसवर विविध उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व बांधकाम मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसानिमित्त निटुरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार,पंचायत समितीचे  सभापती शिवाजीराव मुळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटूरे, 
मनोज कपाळे, विनोद कपाळे, माजी नगरसेवक राहुल अंबेसंगे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले आदींची उपस्थिती होती.
यावेळी क्रांती ( नाना)  मळेगांवकर प्रस्तुत 
न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आॅ र्केस्ट्राचे आयोजन मनोज कपाळे मित्रमंडाळाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये  गप्पा - गोष्टी, रंजक खेळ, धमाल मस्ती, हिंदी - मराठी गाणी, लावणी डान्स यासोबतच पैठणी, सोन्याची नथ व भेटवस्तू जिंकण्याची संधी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज आण्णा कपाळे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments