कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये
विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव कबनुरकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उन्हाळी-2021 च्या ऑनलाईन परीक्षेमध्ये विज्ञान विभागासह अन्य विभागाच्या विद्यार्थ्यांना 13 जुलै रोजीच्या दोन्ही सत्रातील पेपर सायंकाळी उशिरापर्यंत ओपन न झाल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत यात अनेक विद्यार्थी आपआपल्या कॉलेज महाविद्यालयाशी संपर्क साधला असता अनेक
प्रशासनांनी विद्यापीठाशी बोला असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
यावर अनेक विद्यार्थांनी बोलताना सांगितले की हा सर्व प्रकार विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे झाला आहे. हे योग्य असले तरीही महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे.महाविद्यालयाच्या अशा वागणुकीमुळे विद्यार्थी आम्ही नापास तर होणार नाही ना या चिंतेत आहेत त्यामुळे "मास" विद्यार्थी संघटनेचा विभागीय अध्यक्ष या नात्याने माझं सर्व विद्यार्थी मित्रांना आवाहन आहे की विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये आपलं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही याची ग्वाही एक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने सर्व विद्यार्थ्यांना देतो असे जाधव यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी विद्यापीठाच्या वतीने वेळोवेळी होत असलेल्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आज हा सामूहिक विषय असल्यामुळे विद्यापीठाला पुन्हा पेपर घेणे भाग आहे पण अनेक वेळा विद्यार्थी पास असून देखील त्याला नापास केले जाते यात त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,आर्थिक नुकसानीसह मानसिक तणाव निर्माण होतो याची विद्यापीठाने नोंद घ्यावी असे सांगितले.
0 Comments