कोरोनाबाधित रूग्णांची घेतली जाते कुटुंबाप्रमाणे काळजी
अधिका-यांचे उदगीरकरांना घरातच राहण्याचे विशेष आवाहन
उदगीर : येथे दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णाची संख्या ही आरोग्य विभागाची डोके दुखी ठरत होती. या बाबत याची दखल घेवुन मतदार संघाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांनी अनेक आढावा बैठका घेवुन उदगीर - जळकोट मतदार संघातील जनतेची विशेष काळजी घेतली आहे.
उदगीरमध्ये विविध ठिकाणी जवळपास, ३५० बेड, त्यामध्ये औषधाचा पुरवठा, आॅक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, आदीचा पुरवठा केला. शहरातील सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटर, जयहिंद पब्लिक स्कूल, डाॅ.सुधीर जगताप यांचे चंद्राई हाॅस्पिटल, तोंडार पाटी कोविड केअर, पशुवैद्यकीय रुग्णालय, डाॅ.दाचावर यांचे विशाल फंग्शन हाॅल येथील कोविड सेंटर, डाॅ.प्रशांत चोले यांचे विश्वकृपा हाॅस्पिटल, डाॅ.अनुप चिकमुर्गे यांचे अमृत हाॅस्पिटल, पमा सिटीकेअर आदि ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेतली जाते.
यामध्ये प्रामुख्याने तोंडार पाटी येथील कोविड सेंटर नोडल इंचार्ज व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रशांत कापसे व त्यांच्या टिम मधील डाॅ.संजीवनी सुळे ,डाॅ.भरत मदरे, डाॅ.भाग्यश्री घाळे , डाॅ.अनिल काळवणे, डॉ नंदिनी जाधव ,डॉ अंकिता कुलकर्णीे हे कर्तव्य पार पाडत आहेत.
रूग्णांना सेवा देणारे सर्व डॉक्टर्स नर्सेस व इतर वेगवेगळी पदाधिकारी हे देव रूपी आहेत, हेच खरे देव आहेत या कोरोणा माहामारीच्या संकटात आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करत असुन या कोरोणा रुग्णांची रात्रनदिवस सेवा करत आहेत. या बद्दल रुग्णांनी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले आहेत. तोंडार पाटी कोविड सेंटर येथे शेकडो कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर आत्तापर्यंत उपचार केला असुन या ठिकाणच्या रुग्णांना फक्त औषधोपचारंच नव्हे तर पौष्टिक नाष्टा व त्यानंतर जेवण, आयुष काढा दिला जातो. पिण्यासाठी फिल्टरचे पाणी दिले जाते तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योग,प्राणायाम, व्यायामाचे धडे तगयांना दिले जातात.
उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, ग्रामीणचे पो.नि. दिपककुमार वाघमारे, पो.नि. गोरख दिवे हे ही नागरिकांना शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत.
शासकीय रूग्णालयाचे डाॅ.शशिकांत देशपांडे, डाॅ.सतिश हरदास, डाॅ.डांगे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर शहरातील रुग्णांची काळजी घेतली जाते.
या कोविड सेंटर मध्ये डाॅक्टर व नर्सस चे तपासणीचे दररोज चार राऊंड होतात यात प्रत्येक पेशंटचे टेंपरेचर, ऑक्सिजन चार वेळा चेक केले जाते. याच प्रकारे शहरातील सर्व कोविड सेंटरवर अशाच प्रकारची सेवा डाॅक्टर व त्यांचे सहकारी देत आहेत. जयहिंद पब्लिक स्कूल येथील डाॅ.विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली टिम काम करत आहेत.
नोडल अधिकारी डाॅ.प्रशांत कापसे व अजय महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.शिवानी सुळे डाॅ.भरत मदरे , डाॅ.भाग्यश्री घाळे, डाॅ.अनिल काळवने, डॉ नंदिनी जाधव व त्यांचे इतर सहकारी सोनाली वाघमारे, प्रथमेश गायकवाड, कसबे गुरूदालकर, सुर्यवंशी आकाश, वार्ड बॉय अर्जुन, महेश, रामेश्वर, गणेश इत्यादी मोलाचे कार्य करत आहेत.
या कार्याबद्दल वरील सर्वांचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments