गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
उदगीर : आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापदिनानिमित्त गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी ना.बनसोडे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी व कोरोना विरुद्धच्या लढ्यात हुतात्म पत्करणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहुन
सर्व महाराष्ट्रातील नागरीकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी दिपककुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षकविश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले उपास्थित होते.
0 Comments