GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

रेमडेसीवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरनियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

रेमडेसीवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावर
नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती


    लातूर : जिल्हयात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने रेमडेसीवीर इंजेक्शनची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. या इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून जिल्हयातील या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या घाऊक आणि ठोक विक्रेत्यांकडे उपलब्ध्ाह होणारा साठा जिल्हा प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जारी केले आहेत. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी दत्ता सूर्यवंशी, सुरवसे जी.एल., डी.एम. माळी, श्रीमती स्वाती कवळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेमडिसीवीर विक्री करणाऱ्या घाऊक, ठोक विक्रेत्यांकडे उपलब्ध्ा   होणाऱ्या स्टॉकची दैनंदिन माहिती सकाळी 10 वाजेपर्यंत उपजिल्हाधिकारी (सामान्य) (मो.क्र.9823944767, ईमेल- dcglatur@gmail.com ) यांना  सादर करावयाची आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी दररोज या इंजेक्शनची  वितरीत करावयाची माहिती  तयार करतील  त्यानुसार संबंधित विक्रेत्यांनी या इंजेक्शनचे वितरीत करावयाचे आहे. उपजिल्हाधिकारी (सामान्य)  यांनी तहसीलदार आणि  सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग लातूर यांच्या मदतीने घाऊक व  ठोक विक्रेत्यांनी अचानक भेटी देऊन तपासणी करावी. कोणत्याही  परिस्थितीत या रेमडिसीवीर   ची टंचाई भासणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी,असेही या आदेशात म्हटले आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1857 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार, भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल  असेही आदेशात नमूद केले आहे.
                                   *****

Post a Comment

0 Comments