GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोणी ग्रामपंचायत वर "महिलाराज"

लोणी ग्रामपंचायत वर "महिलाराज"!!

 ११ पैकी ६ महिला तर ५ पुरुष सदस्य
 
संरपच पदी उषा यमुनाजी भुजबळे तर उपसरपंच पदी वैजनाथ रामराव बिरादार यांची निवड !

उदगीर -     उदगीर तालुक्यातील लोणी येथील सरपंच निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली‌. यात सरपंच पदी उषा यमुनाजी भुजबळे तर उपसरपंच पदी वैजनाथ रामराव बिरादार यांची निवड करण्यात आली. 
       लोणी ग्रामपंचायत हि ११ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. त्यात ०६ महिला व ०५ पुरुष सदस्य निवडून आले आहेत. आणि सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला साठी राखीव असल्याने ग्रामपंचायत वर महिलाराज आले आहे. 
     लोणी ग्रामपंचायत सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला साठी राखीव करण्यात आले होते. या राखीव आरक्षणातून दोन महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. या दोन्ही महिलांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात उषा यमुनाजी भुजबळे यांना ११ पैकी ०७ मते मिळाली व त्यांची सरपंच पदी निवड करण्यात आली. व उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. ११ पैकी ०७   वैजनाथ रामराव बिरादार यांना मते मिळाली व त्यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. या सरपंच- उपसरपंच निवड प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून राहुल सुर्यवंशी यांना ग्रामविकास अधिकारी बब्रुवान पाटील, तलाठी अनिल मयकलवार यांनी सहाय्य केले.

Post a Comment

0 Comments