वाढदिवसावर वायफळ खर्च न करता सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवावेत - उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी
उदगीर : वाढदिवस साजरे करताना विनाकारण वायफळ खर्च न करता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, रक्तदान शिबीर, रक्त तपासणी शिबीर, सर्वरोग निदान शिबीर, वृक्षारोपण, गरजुंना कपडे व अन्नधान्याचे वाटप इत्यादी सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवावेत तरच खरा वाढदिवस साजरा केल्यासारखे होईल आणि सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच आपणास दीर्घायुष्य लाभेल असे मत उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी व्यक्त केले. ते मौजे गुरधाळ ता.उदगीर येथे बसव ब्रिगेडचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांच्या वाढदिवसानिमित्य नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळ, उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय व एस.आर.एल डायग्नोस्टिक लॅब उदगीर यांच्या वतीने मौजे गुरधाळ ता.उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत रक्त तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी तर उद्घाटक म्हणून विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष
चंद्रकांत वैजापुरे, स्वागताध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नवनाथ गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सत्कारमूर्ती प्रा.सिध्देश्वर पटणे, खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे लातूर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, एस.आर.एल डायग्नोस्टिक लॅबचे ओनर राजेंद्र गायकवाड, प्रा.महादेव वैजापुरे, गुरधाळचे सरपंच वैजनाथ झुंकुलवाड, उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे, कौळखेडचे सरपंच संतोष राठोड, लाॅयन्सचे डॉक्टर तन्वीर पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, गुलदस्ता देऊन यथोचीत सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रा.गोपाळकृष्ण घोडके, नवनाथ गायकवाड यांची यथोचीत भाषणे झाली तर सत्कारमूर्ती प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी सत्काराला उत्तर दिले. यावेळी गुरधाळ गावातील व परिसरातील एकूण 270 लोकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 34 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कर्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शरद शिंदे, प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक नवनाथ गायकवाड तर आभार प्रदर्शन उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे यांनी केले. या शिबिरात गुरधाळ गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते
0 Comments