GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदयगिरी महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

उदयगिरी महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी 


   उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना पेन्सलवार म्हणाले, गाडगेबाबांनी लहानपणापासूनच समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते. त्यामुळेच त्यांनी आयुष्यभर दीनदुबळ्यांची सेवा केली. गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून  अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली तसेच आर्थिक शोषण थांबविण्यासाठीही प्रयत्न केले, असे मत व्यक्त केले.  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी म्हणाले, गाडगेबाबांनी सांगितलेला परिसर स्वच्छतेचा संदेश आपण सर्वजण पाळूयात तसेच मनाच्या स्वच्छतेकडेही लक्ष देऊयात, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी दिनविशेष समिती प्रमुख दीपक चिद्दरवार, कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखा पर्यवेक्षक प्रा. ज्योतिबा कांदे,  प्रा. डॉ.सुरेश लांडगे, प्रा. डॉ. बळीराम भुक्‍तरे, कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रतिभा गायकवाड यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments