२० फेब्रुवारी रोजी लघुपट महोत्सव व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
महामानव डाॅ.आंबेडकर मालिका फेम अभिनेता संकेत कोर्लेकर व अभिनेञी शिवकांता सुतार यांची उपस्थिती
उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर आयोजित राष्ट्रीय लघुपट महोत्सव व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा प्रमुख शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. मागील पाच वर्षापासुन सुरु असलेले राष्ट्रीय लघुपट महोत्सव उदगीर हे ग्रामिण भागाताल देशातील सर्वात मोठा लघुपट महोत्सव आहे . रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक सांस्कृतीक , शैक्षणिक , कृषी व आरोग्य क्षेञातील कार्यकरणार्या मान्यवर व कोरोनाकाळात कार्य करणारे डाॅक्टर, शिक्षक व सामाजिक संस्थाचाही सत्कार केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खा.सुधाकर शृंगारे, राज्यमंत्री संजय बनसोडे , जिल्हा परीषद अध्यक्ष राहुल केंद्रे, चंदन पाटील नागराळकर व कोती , हलाल, हायवे चित्रपट
फेम अभिनेत्री शिवकांता सुतार , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा, मालीकेतील भिवाची भूमिका साकारनारे अभिनेते संकेत कोरलेकर, मनोज गॅस एजन्सीचे संचालक रत्नाकर कांबळे , मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, प्रा. उदयसिंह पाटील अध्यक्ष गोविंदराव पाटील बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर, डॉ.दीपक सोमवंशी, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, प्रा.डॉ. दत्ता मोरे , संदीप मद्दे , बबन चव्हाण , दत्ताजी भोसले, विनोद गुरमे , मनोहर लोहारे हे उपस्थित रहाणार आहेत. सोहळा शनिवार दि .२० फेब्रूवारी रोजी रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे संपन्न होत असुन लघुपट प्रदर्शन सकाळी ११ वाजल्या पासुन होणार असल्याचे संयोजक प्रा. बिभीषण मद्देवाड, अॅड विष्णू लांडगे, अॅड महेश मळगे, प्रा. डॉ. संग्राम गायकवाड , प्रा.डॉ.विजयकुमार कल्लुरकर, मारोती भोसले, रसुल पठाण, सिद्धार्थ सुर्यवंशी, प्रा.रामदास केदार, महादेव खळूरे , दत्तकुमार स्वामी, रामेश्वर पटवारी , जहाॅगीर पटेल , अनमोल कवडेकर , अनिल जाधव, आकाश कांबळे आदींनी केले आहे.
0 Comments