कोविड-19 ची लक्षणे असलेल्या व्यक्तिची
कोरोना चाचणी करुन घ्यावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी
लातूर : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी व्दारे लावण्यात आलेले बहूतांश निर्बंध हटविण्यात आलेले असून विविध सामाजिक, धार्मिक, राजनैतिक कार्यक्रमात मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये सर्दी,खोकला,ताप,अंगदुखी ई. कोविड सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत. असे रुग्ण् जेंव्हा डॉक्टर्सकडे गेल्यानंतर त्यांना अनूषंगिक औषधोपचार देण्यात येतो. परंतु कोविड सदृश्य रुग्णांची कोविड-19 निदान चाचणी होणे आवश्यक असून त्यासाठी लातूर जिल्हयातील शासकीय / खाजगी दवाखान्यात येणाऱ्या अशा रुग्णांची कोविड-19 निदान चाचणी करुन घ्यावी व चाचणीत रुग्ण् पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्वरित उपचार करावेत असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी संबंधितांना सूचित केले आहे.
****
0 Comments