GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील ड्राय रनची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी

उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील ड्राय रनची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी


उदगीर : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लातूर जिल्हयात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या कामाची पडताळणी ड्राय रन प्रात्यक्षिकामार्फत करण्यात आली. पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील ड्राय रन केंद्रास भेट देऊन तेथील प्रात्यक्षिकची पाहणी करून मार्गदर्शक सूचना दिल्या.
       यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने जी तयारी केलेली आहे ती समाधानकारक असल्याचे सांगून ज्यावेळी प्रत्यक्ष लसीकरण  होईल त्यावेळी काल झालेल्या ड्राय रन प्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊन अत्यंत दक्ष पणे काम करावे अशा सूचना केल्या.
       प्रत्यक्ष लसीकरण करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असुन त्यासाठी 19 हजार आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने अद्ययावत करण्यात आलेली असून लस घेतल्यानंतरही सॅनिटायझर, मास्क व कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सुचित केले.
    यावेळी लातूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसिकरणाबाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे या सर्व बाबींची पडताळणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापुर्वी लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे, लसीकरण मोहीमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन प्रात्यक्षिकासह भेट देऊन येथील सुविधांची पाहणी केल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.
     यावेळी उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments