GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लेखक व्यंकट पाटील यांच्या 'यशवंत' कादंबरीचे प्रकाशन

लेखक व्यंकट पाटील यांच्या 'यशवंत' कादंबरीचे प्रकाशन


कल्याण/ठाणे : लेखक व्यंकट पाटील ( सहाय्यक पोलीस आयुक्त, निवृत्त) लिखित आणि कुलस्वामिनी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'यशवंत' या कादंबरीचे प्रकाशन सोमवार दि. २५ जानेवारी २०२१ रोजी सायं ५.००  वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह , पहिला मजला, ठाणे महानगरपालिका, ठाणे (प. ) येथे संपन्न होणार आहे. 
ज्येष्ठ कवी अशोक बागवे अध्यक्षस्थानी असतील. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के विशेष अथिती म्हणून तसेच कादंबरीकार  विश्वास पाटील , दत्तात्रय कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे , जोशी - बेडेकर महाविद्यालयातील  प्रा. संतोष राणे या मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन  संपन्न होणार आहे. रसिकांनी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका वृषाली पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments