GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लसीकरण दिल्यानंतर काही परिणाम आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा

लसीकरण दिल्यानंतर काही परिणाम आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा


लातूर : जिल्हयांमध्ये कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ होऊन 379 आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांना लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण लातूर जिल्हयातील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर, सामान्य रुग्णालय उदगीर, ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर, ग्रामीण रुग्णाूलय औसा, ग्रामीण रुग्णांलय मुरुड आणि एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर अशा 06 लसीकरण केंद्रावर करण्यात आले आहे.
कोविड-19 या आजारावरील लस  सुरक्षित असुन सदर लस दिल्यानंतर काही सौम्य लक्षणे आढळतात ही बाब स्वाभाविक आहे.  सदर  लक्षणांमध्ये  दंड दुखने, कमजोरी थकवा जाणवने, अंग गरम होणे, सौम्य ताप, क्वचीत थंडी वाजने, सांधे दुखी/ अंगदुखी / डोके दुखी, मळमळ / क्वचीत उलटी अशा प्रकारचे लक्षने असु शकतात. 
लसीकरण झालेल्या व्यक्तींनी घाबरुन न जाता आपल्या नजीकच्या शासकिय दवाखान्यांशी संपर्क साधावा किंवा जिल्हा कोविड-19 लसीकरण नियंत्रण कक्षाशी 9923458822 (डॉ.बरुरे बालाजी सुभाष जिल्हा लसीकरण अधिकारी )आणि 8208964425 (डॉ.संतिष लिंगराम हरिदास निवासी वैद्यकीय अधिकारी), 9168640644 (डॉ. महेश पाटील आरोग्य अधिकारी म.न.पा.लातूर) या भ्रमनध्वरीवर संपर्क साधावा. लातूर जिल्हयातील सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण नंतर काही परिणाम आढळल्यावर किंवा जाणवल्यावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात आलेले आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments