GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या घरी सांत्वनपर भेट

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या घरी सांत्वनपर भेट


    लातूर :  मौजे उमरगा (हाडगा) ता. निलंगा येथील सियाचीन येथे कर्तव्यावर  वीरमरण आलेले शहीद जवान नागनाथ अभंगराव लोभे यांच्या घरी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करून  सांत्वन केले. 
    तसेच कर्तव्यावर मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना शासन स्तरावरून सर्वोतपरी मदत करण्याचे निर्देश निलंगा तहसीलदार यांना दिले आणि वैयक्तिक पातळीवर ही वरिष्ठ स्तरावरून  शासन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. 
   यावेळी अभय साळुंखे, सरपंच अमोल बिराजदार, माजी पं. स.सदस्य विलास लोभे, तंटामुक्ती अध्यक्ष जगदीश लोभे, ग्रा.पं.सदस्य अरविंद कांबळे, आत्माराम लोभे, दिनकर दिवे,नामदेव लोभे, पोलीस पाटील अनंतराव पाटील वसंत कौडगावे, वसंत वाडीकर, राजाराम जाधव, माधवराव वाडीकर, वसंत सुरवसे, रणधीर लोभे, बालाजी कोडगावे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments