GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहर भाजपाच्या वतीने फळवाटप

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहर भाजपाच्या वतीने फळवाटप


उदगीर :  भारतीय जनता पक्षाचे संस्थापक  भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उदगीर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम घेऊन स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी उदगीर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय उदगीर येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच राजगिऱ्याचे लाडू ही यावेळी सर्वांना वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, , नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, ज्येष्ठ नगरसेवक मनोज पुदाले,माजी उपसभापती रामदास बेंबडे,भाजपा जिल्हा सचिव तथा नगरसेवक गणेश गायकवाड, नगरसेवक दत्ताजी पाटील, राजकुमार मुक्कावर,नगरसेवक रामेश्वर पवार,भाजप आनंद बुंदे,  शहर सरचिटणीस आनंद साबणे, सुरज हंडगुळे, जिल्हा उपाध्यस ओबीसी विकास जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments