GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नियमित सेवेचे आदेश वाटप

महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना 
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नियमित सेवेचे आदेश वाटप


लातूर : लातूर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नियमित सेवेत सामावून घेण्याचे नियुक्ती आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा  लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते भालचंद्र ब्लड बँक सभागृहात वाटप करण्यात आले.
या नियुक्ती आदेश वाटप व माझे कुटुंब-माझी जबाबदारी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, मनपा विरोधी पक्षनेते ॲड.दिपक सुळ, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहाकरी साखर कारकान्याचे उपाध्यक्ष शैलेश उटगे, ॲड.किरण जाधव उपस्थित होते.
या आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत समाविष्ट करण्यात आलेल्या 51 कर्मचाऱ्यांपैकी प्राथनिधीक स्वरुपात  पाच कर्मचाऱ्यांना यामध्ये श्रीमती कमलाबाई शेंडगे, लिंबाजी मगर, रज्जाक शेख, कैलास कांबळे व भागवत सुर्यवंशी यांना  नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले   व उर्वरित कर्मचाऱ्यांना कार्यक्रमच्या शेवटी सर्व आदेश वितरीत करण्यात आले.यावेळी  माझे कुटुंब-माझी जबाबदारी या स्पर्धेतील विजेते कु.खुशी राजमल्ले,अश्विनी शिंदे, अनिता मुदाळे,रोहीणी जवळगेकर,यांना पारीतोषिके वितरीत करण्यात आले. तसेच परिक्षक म्हणून शिवाजी हांडे,विजयकुमार करजकर व दिपरत्न निलंगेकर यांचा यथेाचित सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते  करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचा संसर्ग संपलेला नाही. जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीने आपणास कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच काही दिवसात कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करावे अशा सूचनाही यावेळी संबंधितांना दिल्या.
प्रारंभी महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन सविस्तरपणे माहिती विषद केली. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे समयोचीत भाषण झाले. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल अमित म्हेत्रे यांनी मानले.
                                             

Post a Comment

0 Comments