GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

खा. सुधाकरराव शृंगारे यांच्याकडून नांदेड- लातूर महामार्ग दुरुस्तीची पहाणी

खा. सुधाकरराव शृंगारे यांच्याकडून नांदेड- लातूर महामार्ग दुरुस्तीची पहाणी

काम वेळेत अन् दर्जेदार करा अधिकाऱ्यांना सुचना

लातूर- खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची सोमवारी (दि.३०) स्वतः पहाणी करुन काम  गुणवत्तापूर्ण व लवकरात लवकर करा अशा सुचना संबधीत अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.
           लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून याचा त्रास वाहनधारक, नागरिकांना होत आहे. त्याचबरोबर वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघातातही वाढ होत आहे. हे टाळून प्रवास व वाहतुक सुरक्षित व सुखकर होण्यासाठी या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे काम गुणवत्तापूर्ण तसेच लवकरात लवकर व्हावे याकडे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी विशेष लक्ष देत आहेत. सोमवारी खा. श्रृंगारे यांनी महमदापूर ते लातूररोड येथे सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळी जावून पाहणी केली. शिवाय महमदापूर ते लातूररोड या मार्गाची व तेथे सुरू असलेले कामही त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. 
यावेळी महामार्गाचे प्रकल्प संचालक सुनिल पाटील, अभियंता मुरलीधर संबधीत कंत्राटदार यांची उपस्थिती होती. या सर्वांशी खा. श्रृंगारे यांनी संवाद साधला व योग्य त्या सुचना केल्या. कामातील गुणवत्तेबद्दल कसलीही उणीव ठेवू नका, काम चांगले , गुणवत्तापूर्ण , दर्जदार व लवकरात लवकर झाले पाहीजे अशा सुचना त्यांनी अधिकारी व कंत्राटदारास केल्या. यावेळी खासदार श्रृंगारे यांच्या समवेत युवानेते शंकरभैय्या श्रृंगारे व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 अधिका-यांना सुचना !
          या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गतीने सुरू करण्यावर आम्ही विशेष लक्ष दिले असून  दिल्या वेळेत व केलेल्या सुचना केंद्रस्थानी ठेवून ते पूर्ण करण्यात येईल ,असे खा. श्रृंगारे यांना अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments