शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार

मुंबई : कोरोनाच्या संटकामुळे (Coronavirus) राज्यातील (Maharashtra) शाळा, ( School ) महाविद्यालये (College) बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतची शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या संबंधित सर्व शिक्षकांची कोरोना तपासणीसाठी (Teacher Corona test) आरटीपीसीआर चाचणी (Corona Test) करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चाचण्या मोफत असणार आहेत. याचा खर्च सरकार उचलणार आहेत.
शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा खर्च सरकार उचलणार । तर शाळांमधल्या सोयी सुविधांबाबत स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश, २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार । ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग
सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर चीचणीची जबाबदारी स्थानिक प्रशासन अर्थात महापालिका आणि जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आलीय.यात शिक्षकांची तपासणी, शाळेचे सॅनिटायझेशन आणि आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून शाळा, महाविद्यालये सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार आहे.
राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सूचनांचे आणि खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. शाळा सॅनिटायझर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे. एक दिवसाआड शाळा वर्ग भरविणे, तसेच कोरोनाबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
0 Comments