इमानदार रिक्षा चालक, 47500 रु ची बॅग केली परत
उदगीर - उदगीर तालुक्यातील लोणी येथील रिक्षा चालक रवी साताळे यांनी प्रवाशाची 47500/- रू रोख रक्कम असलेली बॅग पोलिसांन मार्फत प्रामाणिक पणाने परत केली.
सदरील माहिती अशी की, रिक्षा चालक रवी साताळे नेहमीप्रमाणे उदगीर शहरात रिक्षा चालवत होते. त्यावेळी त्यांच्या रिक्षा मधून काही प्रवासी प्रवास करत होते. त्या प्रवास्यांना शहरातील एका बाल रूग्णालयात सोडून पुढे निघून गेले. बराच अंतर पार केल्यावर त्यांचे लक्ष पाठीमागे गेले व ती बॅग त्यांच्या निदर्शनास आली. बॅग तपासून पाहिले तर त्यात रोख 47500/- रू आढळून आले. व त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी आपला रिक्षा त्या रूग्णालयाकडे वळवला व त्यांच्याशी संपर्क साधला. तोपर्यंत सदर व्यक्ती शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवीन्यासाठी दाखल झाले होते. सदर रिक्षा चालक रवी साताळे हे स्वतः बॅग परत करण्यासाठी आल्याचं समजताच शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी रिक्षा चालक रवी साताळे यांना बोलावून ती रोख रक्कम असलेली बॅग प्रवाशांच्या हती सुपुर्द केली व रिक्षा चालक रवी साताळे यांचे त्यांच्या प्रामाणिकते बद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार कॆला.
यावेळी पोलीस निरीक्षक गोरख दिवे, एपीआय गायकवाड, योगेश फुले, श्रीकृष्ण चामे, पत्रकार श्रीनिवास सोनी, सुनिल हावा, बिभीषण मद्देवाड, सिध्दार्थ सुर्यवंशी, बस्वेश्वर डावळे,आदी उपस्थित होते.
0 Comments