ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कु.वसुंधरा रणक्षेत्रे यांची एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक गट विकास अधिकारी पदी निवड


कु.वसुंधरा रणक्षेत्रे यांची एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक गट विकास अधिकारी पदी निवड

उदगीर : तालुक्यातील तोंडार गावच्या रहिवाशी असणाऱ्या कु. वसुंधरा देविदास रणक्षेत्रे यांची नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात “ सहाय्यक गट विकास अधिकारी” या पदावर निवड झाली.
कु. वसुंधरा रणक्षेत्रे यांनी स्पर्धा परीक्षेत तिसऱ्यांदा यश मिळवल आहे. यापूर्वी त्यांची २०१९ साली नगर विकास विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या कर व प्रशासकीय अधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती व त्या नगर परिषद उदगीर कार्यालयात कार्यरत होत्या तसेच त्यांनी २०२१ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा पास करून राज्य कर निरीक्षक या पदी त्यांनी बाजी मारली व त्या मुंबई येथे राज्यकर आयुक्त कार्यालयात कार्यरत होत्या.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असून ग्रामीण भागातून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकारिता ही प्रेरणा देणारी बाब आहे.

Post a Comment

Previous Post Next Post