किडझी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ग्लिंपसेस ऑफ 2025 उत्साहात
उदगीर : येथील किडझी प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच विशाल फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव गुरुडे होते तर उद्घाटक म्हणून उदयगिरी मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटलचे संचालक डॉ. माधव चंबुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथील बॉटनी विषयाचे विभाग प्रमुख डॉ. राहुल आलापुरे , राहुलआंबेसंगे तर ओम डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. नितीन गुरूडे हे होते.पालकांचे प्रतिनिधी म्हणून बालाजी गंगणे व सौ. विद्या राठोड ह्या होत्या. तसेच मंचावर किडझी स्कूलचे संचालक प्रा. मनोज गुरुडे आणि प्राचार्या सौ. स्वाती गुरुडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. मनोज गुरुडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन प्राचार्य स्वाती गुरुडे आणि प्रा. रामदास मलवाडे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
दरवर्षी वेगवेगळ्या थीम घेऊन सदरील स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले जाते. यावर्षीचे थीम होते ग्लिमसेस ऑफ 2025 , 2025 मध्ये प्रयागराज येथे महा कुंभमेळा झालेला होता त्या कुंभमेळ्यावर आधारीत उत्कृष्ट असे सादरीकरण शाळेच्या चिमुकल्यांनी केले व उपस्थितांची मने जिंकली. ओला दुष्काळावरती सुंदर असे सादरीकरण शाळेच्या मुलांनी केले तसेच पहिल्यांदाच भारताच्या महिलांनी ह्याच वर्षी वर्ल्डकप जिंकलेला होता. त्यावरील सुंदर असे सादरीकरण मुलांनी केले तसेच मिशन सिंदूर वर ही मुलांनी उत्कृष्ट असा देखावा केला.
शाळेच्या छोट्या बालकांनी विविध गीतावर सुंदर असा नृत्य अविष्कार दाखविला व उपस्थितांची टाळ्यांनी दाद मिळवली.
सदरील वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शाळेतील सर्व पालक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरिओग्राफर म्हणून दीपक सोनकांबळे यांनी उत्कृष्ट कार्य केले.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका वर्ग कल्पना देवनाळे , दायमी रफी कुनीसा , सोनाली अनंतवाल ,अनुराधा खानापुरे , भाग्यश्री पाटील , सूर्यभान केंद्रे राधा पांचाळ वनिता इंगळे यांनी परिश्रम घेतले. शेषरावजी धनुरे , सुधीर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment