अनिकेत अतुल करखेलीकर (रामदासी)यांनी उदगीरच्या शिरपेच्यात रोवला मानाचा तुरा
उदगीर : दि. 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित India Ai Impact Summit 2026 (YUVAi Global Youth Challenge अंतर्गत) चि. अनिकेत अतुल करखेलीकर (रामदासी) यांची भारत सरकारतर्फे निवड करण्यात आली. जगभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांमधून निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
या परिषदेत अनिकेत व त्याचा सहकारी निखिल यांनी मिळून “आरोग्य AI” या स्टार्टअप संकल्पनेवर सादरीकरण केले. ग्रामीण व शहरी भागातील डॉक्टरांना रुग्णांची माहिती जलद व अचूक पद्धतीने मिळावी, निदान प्रक्रियेला मदत व्हावी आणि आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढावी या दृष्टीने हा प्रकल्प काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिकेत हा सध्या वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), भोपाळ येथे बी.टेक (Artificial Intelligence आणि Machine Learning) द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
अनिकेतची या जागतिक परिषदेसाठी झालेली निवड ही उदगीर शहरासाठी अभिमानाची बाब असून सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच उदगीरवासीयांनी त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment