GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर शहराबाहेरील रिंगरोड व उदगीर ते देगलूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार

उदगीर शहराबाहेरील रिंगरोड व उदगीर ते देगलूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी घेतली भेट

दोन्ही रस्त्यांच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याच्या ना.नितीन गडकरी यांच्या सुचना

 माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश

उदगीर : उदगीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे या भागाचे आमदार व माजी
मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघाला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करून उदगीरच्या विकासाला चालना देऊन दळणवळणासाठी मागील ५ वर्षात रस्त्याच जाळ निर्माण केलं. उदगीर मतदार संघाला जोडणारे सर्व रस्ते पूर्ण झाले आहेत. मात्र दिवसेंदिवस उदगीर शहरात वाहतुक कोंडी होत असल्याने उदगीर शहराच्या बाहेरून मंजूर करण्यात आलेला रिंगरोड व
उदगीर ते रवी मार्गे देगलूर हा महत्वाचा रस्त्याचे काम तात्काळ चालु करण्यात यावा  म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे माजी क्रीडामंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी आज नागपूर येथे भेट घेवुन विनंती केली.

आ.संजय बनसोडे यांनी या रस्त्यांसाठी वेळोवेळी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी उदगीर शहराबाहेरील १४० कोटींचा रिंगरोड  व उदगीर - रावी - देगलूर या रस्त्यासाठी ८१० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असुन तशा सूचनाही
संबंधित अधिका-यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिल्या आहेत.

रिंगरोडमुळे उदगीर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार असुन
दोन जिल्ह्याला जोडणारा उदगीर - रावी- देगलुर हा अत्यंत महत्वाचा रस्ताही होणार आहे. उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात मोठी रहदारी व वाहतूक असते.  या भागातील मोठ्या बाजारपेठेमुळे येथे देगलूर, निजामाबाद, मुक्रमबाद, करडखेल, मरखेल, बिलोली, मुखेड, रावी, हाळणी व इतर भागातुन नागरिकांची वर्दळ असायची मात्र देगलूरहुन उदगीरला ये - जा करण्यासाठी एक पदरी रस्ता असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. म्हणून नागरिकांची गैरसोय लक्षात घेवुन उदगीरचे आमदार व राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे उदगीर ते देगलूर हा रस्ता करुन द्यावा म्हणून मागील काळात वेळोवेळी दिल्ली येथे जावुन ना.नितीन गडकरी यांची भेट घेवुन मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असुन आता लवकरच या दोन्ही रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.
*************************

Post a Comment

0 Comments