ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मेरी डॅफोडील्स इंग्लिश स्कूल येथे आजी-आजोबांसाठी एक दिवस उपक्रम


मेरी डॅफोडील्स इंग्लिश स्कूल येथे आजी-आजोबांसाठी एक दिवस उपक्रम

नातवंडासोबत धम्माल मस्ती करत वेगवेगळ्या खेळांचा घेतला आनंद

उदगीर : येथील यशवंत सोसायटीत असलेली समर्थ एज्युकेशन सोसायटीची मेरी डॅफोडील्स इंग्लिश स्कूल मध्ये शनिवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी संस्था सहसचिव प्रणयन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आजी-आजोबांसाठी एक दिवस हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक रसूल दा. पठाण उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात रसूल पठाण यांनी मार्गदर्शन करताना संस्काराची पेरणी करणारी छोटी गोष्ट सांगत नातवंडांच्या जीवनात आजी- आजोबा कसे महत्त्वाचे आहेत ते सांगितले. या दिवसाचे महत्त्व विषद करणारी एक धागा सुखाचा ही कविता सादर करताच उपस्थित आजी आजोबांनी भरभरून दाद दिली. अध्यक्षीय समारोपात संस्था सदा प्रा. एम. व्ही. स्वामी यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. आधुनिक युगात अधिक स्मार्ट बनण्याच्या नादात मुलेही तंत्रज्ञानात गुंतली जात आहेत. म्हणून आजी-आजोबांनी आपला अधिकचा वेळ नातवंडासोबत दिला तर संस्कारक्षम व गुणवान पिढी निर्माण होईल असे सांगितले. प्रास्ताविक शैलजा मठपती यांनी केले. यावेळी आजी- आजोबांनी नातवंडासोबत विविध खेळ खेळत धम्माल मस्ती केली. विविध प्रकारचे खेळ मंगल बिरादार व श्रृती चौधरी यांनी घेतले. यावेळी नातवंडानी स्व-हस्ताक्षरात तयार केलेले शुभेच्छा पत्र व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सुत्रसंचालन वर्षा मोरे यांनी केले तर आभार कोमल चिट्टे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post