माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्धाटन
उदगीर : आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवर गेले पाहिजे यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. मागील काळात क्रीडा विभागाचा मंत्री म्हणून खेळाडूंसाठी भरीव निधीची तरतूद करून खेळाडू व प्रशिक्षकासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. आपल्या ग्रामीण भागात कुस्तीला महत्त्व असून उदगीर शहरात स्व.खाशाबा जाधव यांच्या नावाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेऊन कुस्ती स्पर्धेला मोठे बळ निर्माण करून देण्याचे भाग्य मला लाभले असून कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल, दसरा मैदान येथे आयोजित आडत व्यापारी वेल्फेअर असोसिएशन , कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषद उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, माजी सभापती शिवाजीराव मुळे, कल्याण पाटील, वसंत पाटील, भास्कर पाटील, सय्यद जानीमियाँ, चंद्रकांत टेंगटोल, शशिकांत बनसोडे, रवींद्र कोरे, अनिल मुदाळे, शांतवीर मुळे, बाळासाहेब पाटोदे, व्यंकट बोईनवाड, श्रीधर बिरादार, साईनाथ कल्याणी, प्रदीप पाटील, मनोहर बिरादार, नागेश अंबेगावे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
उदगीर येथील व्यापारी बांधवामुळे ही कुस्तीची परंपरा कायम असुन फुटबाॅल, कुस्ती, व्हाॅलीबाॅल, कबड्डी, खो - खो, बास्केटबाॅल, क्रिकेट यासारखे खेळ आपल्या भागात मोठ्या प्रमाणात खेळले जातात. या खेळामधुन आपल्या भागातील अनेक खेळाडु राष्ट्रीय पातळीवर आपला नावलौकिक वाढवला आहे. खेळाडुंसाठी
हरियाणा येथे आॅलंम्पिक भवन उभारले असुन त्याच धर्तीवर पुण्यामध्ये ८० कोटीचे
आॅलंम्पिक भवन उभारत आहे यामुळे व आपल्या महाराष्ट्रातून अनेक खेळाडु निर्माण होवून आपल्या देशाचे नाव करतील असा विश्वास आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातुन कुस्ती पैहलवान व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment