ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर आर्य वैश्य समाजाच्या अध्यक्षपदी किशोर पंदीलवार


उदगीर आर्य वैश्य समाजाच्या अध्यक्षपदी किशोर पंदीलवार 

उदगीर : येथील आर्य वैश्य समाज बांधवांची नगरेश्वर मंगल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते किशोर पंदीलवार यांची निवड करण्यात आली.
उदगीर येथील आर्य वैश्य समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी अजय मलगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 
      निस्वार्थ भावनेने आणि सातत्याने कार्य करणारे किशोर रमेश पंदीलवार हे मागील अनेक वर्षांपासून समाजाच्या युवा कार्यकारिणी सोबत सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजातील युवकांना संघटित करणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे, शिक्षण व आरोग्यविषयक जनजागृती, आर्थिक सहकार्य तसेच समाजातील एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान समाजासाठी मोलाचे आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून ही त्यांनी सर्वसमावेशक काम केले आहे. त्यांचे संपूर्ण कार्य लक्षात घेऊन आर्य वैश्य समाज बांधवानी त्यांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी आर्य वैश्य समाजाची अन्य 51 सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्याचे अधिकार नूतन अध्यक्ष किशोर पंदीलवार यांना सर्वानुमते बहाल करण्यात आले. 
या बैठकीस डॉ. तानाजी चंदावार, विजयकुमार पारसेवार, शशिकांत पेन्सलवार, गणेश मुक्कावार, रामचंद्र मुक्कावार, उमानाथ कोटलवार, विनोद पत्तेवार, मुकुंद मुक्कावार, संदीप चिद्रेवार, मनोज कोटलवार, लक्ष्मीकांत चिद्रेवार, रामदास जळकोटे, मिलिंद मुक्कावार,बालाजी बोथीकर, किशोर बोथीकर, बालाजी पोलावार, ज्ञानेश्वर पारसेवार, रोहित मुक्कावार, राहुल वट्टमवार, सचिन चन्नावार, श्रीनिवास रायचूरकर, कैलास पारसेवार, अभय पारसेवार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. बालाजी जगळपुरे व सुभाष वट्टमवार यांनी काम पाहीले.

Post a Comment

Previous Post Next Post