लंडन येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे वंदन
प्रचंड प्रेरणा आणि संघर्ष करण्याचे सामर्थ्य देणाऱ्या वास्तूला वंदन करणे हे मोठे भाग्य : आमदार संजय बनसोडे
उदगीर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील स्मारकाला
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी काल सपत्नीक वंदन करुन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आंदराजंली वाहिली.
आज मी जे काही आहे ते सर्व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची देन आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील शोषित, वंचित आणि प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे याची मला पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.
लंडन येथील हे स्मारक आज केवळ एक इमारत नसून, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांचा प्रसार करणारे प्रेरणास्थान आहे. महामानवांनी सर्व मानव जातींना जगण्याचा व न्यायाचा अधिकार दिला.
सन १९२१ ते २२ या कालखंडात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन या ठिकाणी वास्तव्यास होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वापरातील वस्तू, पुस्तके आणि इतर बाबी इथे उत्तमरित्या जतन केल्या आहेत. प्रचंड प्रेरणा आणि संघर्ष करण्याचे सामर्थ्य देणारी ही वास्तू प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे.
ही भेट म्हणजे केवळ एका वास्तूची पाहणी नव्हे तर समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या मूल्यांना पुन्हा एकदा उजाळा देणारा अनुभव होता.
या पवित्र स्थळला कुटूंबासोबत जावुन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित या ऐतिहासिक वास्तुला भेट देता आली ही बाब माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. ज्ञानाच्या अथांग सागरास वंदन केल्यानंतर लोकसेवा करण्याचे बळ आणि ऊर्जा मिळाल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने हे स्मारक महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आणल्यामुळे राज्य सरकाराचेही आभार आ.संजय बनसोडे यांनी मानले आहेत.
********************
0 Comments