पेनटाकळी कालव्याच्या ७२ कोटी रुपयांच्या कामाचे केले भूमिपूजन
शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात यांच्या पाठपुराव्या मुळे आधिकारी आलेॲक्शन मोडवर
मेहकर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिध्दार्थ खरात यांनी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेनटाकळी कालव्या बाबत असलेल्या समस्येवर उपाययोजना जाणून घेऊन शासकीय विश्रामगृह तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तीन दिवसाच्या आत पाठपुरावा करून आज आज दि.५ डिसेंबर २०२४ रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पेन टाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे ७२ कोटी रुपयांच्याच्या कामाचे भूमिपूजन केले. सदर भूमिपूजन व पेनटाकळी प्रकल्पावरील विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस नेते ॲड. अनंत वानखेडे,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर,सरपंच परमेश्वर शिवाजी वानखेडे ,राष्ट्रवादीचे नेते भास्कर काळे, शिवसेना उबाठाचे मेहकर तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव, युवासेना प्रमुख ॲड. आकाश घोडे,मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना नेते ॲड संदिप गवई, एस.एस.सोळंके कार्यकारी अभियंता बुलढाणा पाटबंधारे विभाग बुलढाणा ए. बी.चोपडे कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प विभाग देऊळगाव राजा मिलिंद तांबागडे उपविभागीय अधिकारी जिगाव, प्रकल्प पुनर्वसन उपविभाग क्रमांक तीन नांदुरा ह.मु मेहकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावरून नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्यामुळे अधिकारी कर्मचारी ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे शेतक-यांतुन आनंद व्यक्त होत आहे.
0 Comments