GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

टॅटू पासून होणाऱ्या एड्स बाबत जागृती आवश्यक : प्राचार्य उषा कुलकर्णी

टॅटू पासून होणाऱ्या एड्स बाबत जागृती आवश्यक : प्राचार्य उषा कुलकर्णी
 
उदगीर - हाता पायावर गोंदविने ची फॅशन वाढली आहे . अशा गोंदविणे अर्थातच टॅटू पासून होणाऱ्या एड्स बाबत जागृतीची नितांत आवश्यकता असल्याचे प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी सांगितले. टॅटू सारख्या सेवा देणाऱ्यांना एचआयव्हीचा किंवा रक्तापासून होणारे इतर संसर्ग याचा प्रसार कसा होत असतो आणि तेरोखण्यासाठी कशी खबरदारी घ्यावी याचे प्रशिक्षण द्यायला हवे असे त्यांनी सांगितले .
  तुम्ही टॅटू किंवा बॉडी पिअर्सिंग करणार असाल, तर ती सेवा देणाऱ्याला एड्स किंवा हेपॅटायटिस बी सारखे रक्तातून होणारे इतर संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घेत आहे, याची विचारणा करायला हवी तरच आपण एड्स ला प्रतिबंध घालण्यात यशस्वी होऊ शकतो . 
  जागतिक  एड्स निर्मूलन दिनानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित    कस्तुराबाई नर्सिंग स्कूल  जि एन एम  व सामान्य रुग्णालयाच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली  काढण्यात आली . रॅलीची सुरुवात सामान्य रुग्णालय येथे करत नगरपरिषद कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जात  समारोप  सामान्य रुग्णालय  परिसरात करण्यात आला यावेळी सामान्य रुग्णालयाचे  वैद्यकिय अधिक्षक,डॉ. पी. के. दोडके
डॉ. एस. एस. सोनवणे. नोडल अधिकारी ए आर टी डाँ गौतमी वीर, वैद्यकियआधिकारी एआरटी, शशिकांत महालिंगे,उमाकांत कांबळे, रणजित पाटील मारोती सोनकांबळे, प्रिंयंक चव्हाण , शुभांगी पाटील राजकुमार सोमवंशी,बालाजी गायकवाड,मायि बोळेगावे,सुरेखा इंगळे मातृभूमी नर्सिंगस्कूलचे राहुल जाधव, लखाते प्रतिक्षा ,मर्ढे अंकाता आदी उपस्थित होते. यावेळी कस्तुराबाई नर्सींग स्कुलचे   विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments