GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पत्रकार साहित्य समेंलनाच्या बोधचिन्हाचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते अनावरण

पत्रकार साहित्य समेंलनाच्या बोधचिन्हाचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते अनावरण

उदगीर : रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने  आयोजित दि. २० आॅक्टोबर रघूकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय पञकार साहित्य  संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण ,बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.  
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ट पत्रकार डॉ. रवींद्र चिंचोलकर हे राहणार आहेत  उद्घघाटन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. तसेच स्वागताध्य ना.संजय बनसोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
बोधचिन्हाच्या अनावरणा प्रसंगी लोकमतचे जेष्ट पञकार विनायक चाकुरे , पञकार भवन कृती समितीचे समन्वयक युवराज धोतरे, पञकार अशोक कांबळे, दिव्य मराठीचे  ता.प्रतिनिधी अन्वरखाँ पठाण, दादाराव दाडगे,  प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष , मराठी पञकार परिषदेचे मराठवाडा विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, नवभारतचे प्रतिनिधी श्रीनिवास सोनी , स्टार दर्पणचे संपादक सुनिल हावा , दै दंडाधिकारचे संपादक आर्जून जाधव , जनस्तंभचे संपादक सिद्घार्थ सुर्यवंशी , प्रजापञचे प्रतिनिधी नागनाथ गुट्टे, रंगकर्मीचे रसुल पठाण ,रामदास केदार ,लक्ष्मण बेंबडे, निळकंठेश्वरचे संपादक विक्रम हालकीकर, नव्यादिशाचे संपादक राजीव किणीकर,  दिव्य मराठीचे भरतकुमार गायकवाड, दै पुढारीचे हणमंत केंद्रे ,  पञकार निवृत्ती जवळे, संदीप निडवदे,आदी उपस्थित होते.
समेलनानात संविधान दिंडी, परिसंवाद, न्युजलेस कवितेची काव्यमैफील , कविसंम्मेलन , राज्यस्तरीय पञकार पुरस्कार वितरण आणि समारोप अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजित केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments