GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माउंट लिटरा झी स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा

माउंट लिटरा झी स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा
 

उदगीर : उदगीर येथील ज्ञानदीप उदयगिरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारे संचलित माउंट लिटरा झी स्कूल मध्ये संस्थचे उपाध्यक्ष बस्वराज बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. याच दिवशी ठिक सकाळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती तर्फे  राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार प्राप्त व (सेवानिवृत्त शिक्षक) विश्वनाथ मुडपे  याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी अहमदपूर नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. अश्विनीताई कासनाळे व संस्थेचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, संस्था सदस्य राजकुमार चौधरी, कुमार स्वामी चौधरी, सेवानिवृत्त प्राध्यापक चंद्रकांत भद्रशेटे, सुभाष बडी हवेली आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना चौधरी, ज्योती वटमवार, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. 
प्रमुख पाहुणे विश्वनाथ मुडपे व आश्विनी कासनाळे व शाळेचे क्रिडाशिक्षक विरासागर काळे व सारिका नवटके यांचा शाळेच्या वतीने स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत देशभक्ती पर समूह गीत गायले. अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिक, थोर पुरुष, देशभक्तांची विविध वेशभूषा परिधान करून सादरीकरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिवस या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीत नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापीका यांनी केले.  या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विश्वनंदनी कदम व अर्जुन मुचळंबे यानी केले तर आभार प्रिती सुंगधी यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व कर्मचारी, शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments