GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा : भाजप शहराध्यक्ष मनोज पुदाले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा : भाजप शहराध्यक्ष मनोज पुदाले


उदगीर :  महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेचा उदगीर शहरातील पात्र महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी केले आहे. 

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे  या योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 ते 60 वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी  1 जुलै 2024 पासून सुरू झाली असून या योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवट तारीख 15 जुलै 2024 ही आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र रहिवासी असावा,विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असावी, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, 60 वर्षे पेक्षा जास्त वय नसले पाहिजे आदी पात्रता असून 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी Tax भरत असेल तर, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर, कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल, कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून ) तर या महिला अपात्र ठरतील.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो आदी कागदपत्रे सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाणार असून या योजनेचा शहरातील सर्व पात्र महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments