पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय येणकीचा 92%निकाल उज्वल निकालाची परमंपरा कायम
उदगीर : तालुक्यातील येणकी येथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाचा दहावी चा निकाल 92% लागला असुन शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
उदगीर तालुक्यातील येणकी येथील पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालयाचा दहावी वर्गाचा निकाल 92% लागला असुन यात विशेष प्राविण्यासह 22 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत 12 ,व्दितिय श्रेणीत 8 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यामध्ये नंदनी दामोदर लोणे या विद्यार्थिनीने 91.60 %गुण घेऊन प्रथम तर स्नेहा ज्ञानेश्वर बिरादार 91.20 ,तृतिय राजश्री पुरुषोत्म बिरादार 89.40 गुण घेऊन उत्तिर्ण झाले असुन शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे .गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामराव बिरादार ,सचिव ज्ञानेश्वर बिरादार, संस्थेचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक अंगद बिरादार,व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments