GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

'स्कूल संसद' मध्ये लालबहादुरचा पक्ष व पंतप्रधान सायली कुलकर्णी महाराष्ट्रात प्रथम

'स्कूल संसद' मध्ये लालबहादुरचा  पक्ष व पंतप्रधान सायली कुलकर्णी महाराष्ट्रात प्रथम

उदगीर शहरात विजेत्यांचे ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत

उदगीर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये संसदीय कामकाजाचा अनुभव देण्यासाठी पुणे येथील *दीपस्तंभ चॅरिटेबल* या नामांकित संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 'स्कूल संसद' एक नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये राज्यभरातून 144 शाळांनी सहभाग नोंदवला होता . यावर्षी प्रथमच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने सहभाग नोंदवला व लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाने  प्रथम फेरीमध्ये बाजी मारत लातूर बीड नांदेड विभागातून अंतिम फेरीत प्रवेश  मिळविला .
   पुणे येथे संपन्न झालेल्या या अंतिम फेरीत  पंतप्रधान म्हणून सायली कुलकर्णी तर खासदार म्हणून अक्षरा दुरुगकर व भक्ती पटणे हिने कामकाज पाहिले. स्पर्धेची समन्वयिका म्हणून अनिता येलमटे यांनी मार्गदर्शन केले. या सहभागी विद्यार्थीनीने अतिशय अभ्यासपूर्ण सादरीकरण केले  व संसद भवनात ठराव मांडला तसेच अतिशय तज्ञ परीक्षक व विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रश्नांना सामोरे जात त्यांनी मांडलेला ठराव बहुमताने पारित झाला. भारतीय लोकशाही मधील संसद व्यवस्था ,मंत्रिपदे ,त्यांचे कामकाज इत्यादीचा अनुभव देणारी ही स्पर्धा होती.  या अंतिम फेरीत  पंतप्रधान सायली कुलकर्णी  हिला वैयक्तिक उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले तसेच  भारत मंथन पक्षाच्या  पंतप्रधान सायली कुलकर्णी  ,खासदार अक्षरा दुरुगकर ,भक्ती पटणे  यांना उत्कृष्ट पक्षाचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.      
       उदगीर शहरात विजेत्या संघाचे आगमन होताच लालबहादूर शास्त्री संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासुणे ,सहशिक्षक संतोष कोले, मनोज भंडे, प्रीती शेंडे, सुरेखा शिंदे ,रागिनी बर्दापूरकर ,लक्ष्मी चव्हाण, प्राजक्ता जोशी व सहभागी विद्यार्थ्यांचे पालक उमाकांत कुलकर्णी, गुंडप्पा पटणे ,नितीन दुरुगकर व प्रा. सिद्धेश्वर पटणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने स्वागत व सत्कारासाठी शिवाजी चौक येथे उपस्थित होते .यावेळी शाळेच्या वतीने ढोल ताशे व फटाक्यांची आतिषबाजी करून विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
     या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे  भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह  डॉ.हेमंत वैद्य , पूर्व कार्यवाह नितीन शेटे ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह तथा केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य  शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे ,मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक  संजय कुलकर्णी , पर्यवेक्षक कृष्णा मारावार , लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले  व  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments