गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कार देणारे पांडुरंग विद्यालय
रौप्य महोत्सव कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे मत
उदगीर : तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालय म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संस्कार देणारे विद्यालय असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
श्री पांडुरंग विद्यालयाचा रौप्य महोत्सव वर्ष उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंद केंद्रे, ह. भ. प. कैलास महाराज लिंगधाळकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रा. श्याम डावळे, बाजार समितीचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, राहुल अंबेसंगे, उदयसिंग ठाकूर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे, बाळासाहेब मरलापल्ले, व्यंकटराव मरलापल्ले, हाणमंतराव हंडरगुळे, समद शेख,रऊफ शेख, राष्ट्रवादी युवक काॅग्रसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, कल्लूरचे सरपंच लक्ष्मण कुंडगीर, राहुल कुंडगीर,
उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय बनसोडे म्हणाले की, विनायकराव बेंबडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून ही शाळा काढली. या शाळेसाठी सध्या आमदार फंडातून पंचवीस लाख रूपयांचा निधी जाहीर करत असून भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव विनायकराव बेंबडे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या पुढाकारातून ही संस्था मिळाली असल्याचे सांगीतले. अध्यक्षीय समारोपात माजी आमदार गोविंद केंद्रे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांची इच्छाशक्ती प्रबळ असेल. तर ते मोठया पदापर्यंत पोहचू शकतात. आज अनेक कष्टकरी, शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षा पास होऊन आयएएस, आयपीएस बनत आहेत. म्हणून ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड न बाळगता अभ्यास करून यशस्वी व्हावे. यावेळी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या पांडुरंगाची ज्ञानगंगा या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. प्रविण भोळे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक एस. डी. नादरगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांसह कल्लूर, इस्मालपूर, मन्न उमरगा, अनुपवाडी, कर्लेवाडी, वंजारवाडी, एकुर्का रोड आदीं गावचे पालक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
0 Comments