GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

समर्थ विद्यालयात ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते बंदिस्त सभागृहाचे भूमीपूजन

समर्थ विद्यालयात ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते बंदिस्त सभागृहाचे भूमीपूजन

आपल्या भागातील खेळाडुंना प्रोत्साहन देणार : क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे


उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत मंजूर झालेल्या बंदिस्त प्रेक्षागृहाचे भूमीपूजन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, कृउबाचे संचालक प्रा. श्याम डावळे, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, सरपंच चंद्रकलाबाई ज्ञानोबा कांबळे, समद शेख, पाशा मिर्झा, जानीमियाँ शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहिदास कुंडगीर, व्यापारी उध्दव भोसले, हाळीचे उपसरपंच राजकुमार पाटील याच्यांसह परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना ना.संजय बनसोडे म्हणाले की, मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. या पदाचा उपयोग मतदार संघाचा चौफेर विकास करण्यासाठी करणार असुन क्रीडामंत्री म्हणून काम करत असताना जिल्ह्यातील शाळांना भरीव निधी उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना खेळात पारंगत करणार आहे. यासाठी आज एकुर्का रोड येथील समर्थ विद्यालयात ४० लक्ष रुपयाचे अत्याधुनिक बंदिस्त सभागृहाचे भूमीपूजन होत आहे. भविष्यात या सभागृहात विविध खेळ मुलांना खेळता येणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एम. व्ही. स्वामी यांनी केले तर आभार अमर जाधव यांनी मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, प्रा. बी. एस. बाबळसूरे, प्रयास चौधरी, प.स. चे माजी सदस्य दत्तात्रय बामणे, मोर्तळवाडीचे सरपंच प्रभाकर पाटील, चिमाचीवाडी चे सरपंच नाथराव बंडे, एकुर्का रोड चे माजी सरपंच जगदीश जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार कांबळे, माजी चेअरमन चंद्रकांत साळुंके याच्यांसह विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments