नियमाचे उल्लघंन केल्यास कडक कारवाई करणार : पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम
बुलेटचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरून
कर्नकर्कश आवाज करणा-या बुलेट पोलिसांनी चालवला बुलडोजर
उदगीर : शहरामध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर असून त्यातच भर म्हणून शहरात मोठ्या प्रमाणावर मॉडिफाइड सायलेन्सर वापरून आवाज काढत मोठ्या प्रमाणावर बुलेट रस्त्यावर कर्नकर्कश आवाज करत धावत होते.
शासनाच्या वाहतूक नियमात ते बसत नसल्याने अशा बुलेट धारकावर विशेष मोहिमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या नेतृत्वाखाली उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी कठोर कारवाई मागील सहा महिन्यापासुन सुरु केली होती. यामध्ये शंभरहून अधिक मॉडिफाइड बुलेट धारकावर दीड लाख रुपये दंड आकारून जप्त केलेले बुलेटचे सायलेन्सर वर दि.07 नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात रोड रोलर फिरून सदर सायलेन्सर नष्ट करण्यात आले.
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी उदगीर शहरातील वाहतूकदारांना आवाहन करत कर्नकर्कश आवाज करुन ध्वनी प्रदूषण करणारे असे अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नयेत त्याचप्रमाणे फॅन्सी नंबर प्लेट दादा, काका, भाऊ अशा वापरणाऱ्यावर आणि विना नंबर वाहन वापरणाऱ्यावरही आता धडक कारवाई करण्यात येणार असुन वाहनधारकांनी तात्काळ फॅन्सी नंबर्स स्वतःहून काढून घ्यावेत मोटरसायकलवर आर.टी. ओ मान्यता प्राप्त फॉरमॅटमध्येच आपल्या वाहनाचा नंबर टाकावा अन्यथा अशी वाहने दंडास पात्र ठरतील व त्याचप्रमाणे उदगीर शहरात मोठ्या प्रमाणावर अॅटो रिक्षांची संख्या असून रिक्षामध्ये अनाधिकृत पद्धतीने साउंड बॉक्स लावून मोठ्या आवाजात गाणे लावुन गोंगाट केला जातो ही बाब निदर्शनास आल्यानंतर धडक कारवाई करून सदर रीक्षा मधील 90% अधिक रिक्षा मधील साउंड बॉक्स काढून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मध्यभागी वापरण्यात येणारा आरसा देखील काढण्यात आला असुन रिक्षा धारकांना युनिफॉर्म खाकी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व वाहनधारकांनी
शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे त्याच पालन करणे आवश्यक आहे अन्यथा अशा रिक्षाचालकावर पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उदगीर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार मोतीपवळे, पोलीस शिपाई अविनाश फुलारी, पोलीस शिपाई गणेश बामणे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस नाईक शिवपुजे यांच्या पथकाने केली असल्याने सर्व पोलीस बांधवांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments