GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कानपूर्णे, बेंबडे यांचा सेवानिवृत्ती कार्य गौरव सोहळा

कानपूर्णे, बेंबडे यांचा सेवानिवृत्ती कार्य गौरव सोहळा

उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक बी. जी. कानपूर्णे हे ३८ वर्षाची सेवा, तर प्रा. पी. जी. बेंबडे यांनी २९ वर्षाची सेवा करून मे महिन्यात सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, सत्कारमूर्ती श्री व सौ. बी. जी. कानपूर्णे, श्री व सौ. पी. जी. बेंबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भर पेहराव, शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले, सेवा काळात त्याग अन् समर्पन भावनेतून केलेले कार्य उल्लेखनीय असे होते. यापुढील काळात ही आपले योगदान महत्त्वाचे आहे. सुत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. तर आभार अमर जाधव यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व दोन्ही शिक्षकांचे नातेवाईक मोठ्या संख्येनी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments