GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर येथे बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळा संपन्न

उदगीर येथे बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळा संपन्न

मान्यवरांच्या उपस्थितीत विविध भागातील २० जोडपे विवाहबध्द

उदगीर : येथील कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या ४ वर्षापासून मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये यावर्षी २० जोडप्यांचा बौध्द धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद मैदान येथे दि. ३० मे रोजी मंगळवारी सांयकाळी ६. ४५ वाजता पार पडला  असल्याची माहिती आयोजक पप्पू गायकवाड यांनी दिली.
कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी बौद्ध धर्मिय सामुहिक मंगल परिणयाचे यंदा हा चौथा सोहळा असुन या सामुहिक बौध्द धर्मीय मंगल परिणयास लातुरचे खा. सुधाकरराव शृंगारे ,  माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, भंन्ते नागसेन बोधी, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, देविदास कांबळे, भरत चामले, गजानन सताळकर, सुधाकर बिरादार, दत्ता बुरले, माजी न. प. सदस्या सुनिता इबीतदार, डॉ. दीपक  सोमवंशी, बाबुराव आंबेगावे, अँड. बालाजी सूर्यवंशी, नरसिंग कदम, राजकुमार वाघमारे, विद्यासागर डोरनाळीकर, बंडे विजयकुमार, विनोद सोनकांबळे, साधू गायकवाड, अमोल तांबरे, वनब्रह्मा साखरे, राजू कांबळे, दीपक ढवळे, नामदेव भोसले, रत्नदीप कांबळे, विलास सूर्यवंशी वलांडीकर, कांबळे दयानंद माजी जि. प. सदस्य, मारुतीराव चौधरी गुरुजी, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम माधुरी उपसरपंच, गायकवाड गौतम, गायकवाड अमर, दशरथ गायकवाड, यांच्यासह २० दाम्पंत्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल आयोजक पप्पु गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments