बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र काढुन देऊन फसवणूक केल्याने एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
उदगीर : प्लॉटचे मंजूर रेखांकन व अकृषी परवाना नसल्याने खरेदीखत करता येत नसल्याने त्यासाठी गुंठेवारी करणे आवश्यक आहे. म्हणून नगरपालिकेचे कामे करतो असे सांगुन नगरपालिका कार्यालयातून गुंठेवारी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पैसे घेऊन बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र काढून दिल्या प्रकरणी शहरातील एकाव्यक्ती विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी शिवकुमार बस्वराज पांडे (रा.तोंडार), ताजोद्दीन शेख (रा. कमरोद्दिनपूर ता.देवणी) व धनराज पाटील (रा रावणकोळा, ता मुखेड) हे संयुक्त मालक असलेल्या उदगीर येथील जमीन सर्वे नंबर २२१/३ प्लॉट क्रमांक ३८ चे मंजूर रेखांकनानुसार अकृषी नसल्यामुळे गुंठेवारी परवाना काढण्यासाठी नगरपालिकेला जात येत असताना तिथेच एजंट म्हणून काम करणारा अतिक लाईक शेख (रा.हावगीस्वामी चौक, उदगीर) हा पालिकेत प्लॉटची नामांतर गुंठेवारी प्रमाणपत्र बांधकाम परवाना काढून देत असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही त्यास मार्च २०२० मध्ये भेटून गुंठेवारी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यानंतर सदर आरोपीने ३० हजार रुपयाची मागणी केली बैठकी अंती २७ हजार रुपये मध्ये पालिकेतून गुंठेवारी प्रमाणपत्र काढून देण्याचे ठरले त्यानुसार सदर आरोपीने १७ मे २०२० रोजी गुंठेवारी प्रमाणपत्र क्रमांक जी १५७८ आणून दिले त्यानुसार सदरील क्रमांकाचा प्लॉट या गुंठेवारी प्रमाणपत्राच्या आधारे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी काशीराम रामराव राठोड यांना येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदीखत करून देण्यात आला.
त्यानंतर १७ डिसेंबर २०२१ रोजी फिर्यादीच्या असे लक्षात आले की आपली शेख याच्यावर बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर फिर्यादीस काढून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची फिर्यादी यांनी नगरपालिकेत जाऊन पडताळणी केली असता सदरील क्रमांकाचे गुंठेवारी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळुन आले. त्यानुसार प्लॉट मालकाच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी दि.१० मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात रात्री सदर आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. यावरून उदगीर शहरातील असे आणखी किती बनावट प्रकरणे असतील याचा छडा लावणे गरजेचे असल्याची चर्चा नागरीकातुन होत आहे.
0 Comments