GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

किड्झी स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे


किड्झी स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

उदगीर : येथील किड्झी स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात संपन्न झाले.
मागील 10 वर्षापासून किड्झी स्कुल हे आपल्या उदगीर शहरात कार्यरत आहे. 
या स्नेहसंमेलबाच्या  अध्यक्षपदी गोविंदराव गुरुडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके , मातृभूमी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सतिश उस्तुरे , डाॅ. नितीन गुरुडे, पालकांचे प्रतिनिधी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे  शाखा बंधक की मीरा मोहीद्दीन सयद व त्यांच्या पत्नी सौ. फिरदोस सय्यद हे उपस्थित होते. किडझी स्कुलचे संचालक प्रा. मनोज गुरुडे व शाळेच्या प्राचार्या सौ.स्वाती गुरुडे आदी उपस्थित होते. 
यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सकाळच्या सत्रामध्ये शाळेच्या सर्व चिमुकल्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घेतला व विविध वेशभुषेचा अविष्कार दाखवला.
प्रतिवर्षाप्रमाणे वेगवेगळे विषय घेऊन किडझी शाळेचे स्नेहसंमेलन पार पडते.त्यात देशासाठी
लढणाऱ्या वीर जवानांवर तर कधी गो - ग्रीन वर तर कधी आपल्या सर्व नात्यावर यावर्षीचे विषय घेवुन तर  मातीचा - गर्व महाराष्ट्राचा स्नेहसंमेलनामध्ये मध्ये महाराष्ट्रातील विविध लोक कला सण व उत्सव कलेच्या व नृत्याचा रुपाने दाखविण्यात आले.  सोबत विविध चित्र गाण्यांवर ही शाळेच्या चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. त्यासोबतच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्रावर आधारीत नृत्य कला दाखविण्यात आली. छ.शिवाजी महाराजांना घोड्यावर बसुन, फुलांची उधळण करत व्यासपीठापर्यंत आणण्यता आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज गुरुडे यांनी केले तर सुत्रसंचलन शाळेच्या प्राचार्या स्वाती  गुरुडे यांनी केले तर आभार प्रा. रामदास मलवाडे यांनी मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षीका - आधीन कुरेशी, शिल्पा गिरी, कल्पना कांबळे, शुभांगी कोटलवार, रफी का दायमी, सोनाली अनंतवाळ, वर्षा पाटील आदीसह सूर्यभान केंद्रे, गोविंद कांबळे, वनिता इंगळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments